हिमा दास पोलिस दलात झाली DSP; म्हणाली..

 Hima Das हिमा दास शुक्रवारी पोलिस दलात डीएसपी पदावर रूजू झाली. राज्य मंत्रिमंडळाने काही दिवसांपूर्वी तिला पोलिस दलात डीएसपी करण्याचा निर्णय घेतला होता.

Hima das
गुवाहाटी: भारताची स्टार महिला धावपटू हिमा दास (hima das) ही शुक्रवारी आसाम पोलिस दलात डीएसपी (DSP) पदावर रुजू झाली. मैदान गाजवणारी हिमा दास पोलिस पोशाखात रुबाबदार दिसत होती. काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या अध्यक्षतेखालील राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हिमा डीएसपी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

हिमाने आयएएएफच्या वर्ल्ड अंडर २०च्या चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय धावपटू आहे. हिमाच्या नावावर ४०० मीटर स्पर्धेचा राष्ट्रीय विक्रम देखील आहे.

पोलिस दलात दाखल झालो असलो तरी हिमाने धावपटू म्हणून करिअर सुरूच ठेवणार असल्याचे सांगितले. हिमाने २०१८च्या आशियाई स्पर्धेत महिलांच्या ४०० मीटरमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. त्याच बरोबर महिलांच्या ४०० मीटर रिलेच्या विजेत्या संघात ती होती.

Comments